इंदुरीकर महाराज प्रकरणाची सुनावणी ‘या’ दिवशी होणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-कीर्तनातून ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्याविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा निकाल काय लागणार आहे याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता 19 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान या खटल्याची सुनावणी संगमनेरच्या सत्र न्यायालयात चालू आहे.

आज (बुधवार ता.16) न्यायालयात सुनावणी होणार होती. परंतु, न्यायालय इतर खटल्यांमध्ये व्यस्त असल्याने आज पुन्हा सुनावणी टळली असून, शनिवार दि.19 डिसेंबर, 2020 रोजी सुनावणी होणार आहे.

या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अरविंद राठोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर इंदुरीकरांतर्फे अ‍ॅड.के.डी.धुमाळ तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अ‍ॅड.रंजना गवांदे बाजू मांडत आहेत.

दरम्यान, न्यायालयाने दिवाणी न्यायालयातील नकला सुनावणीवेळी सादर करण्याचे आदेश दिले होते. परंतु, सुनावणी झाली नसल्याने 19 डिसेंबरला होणार्‍या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe