ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवरून खा. सुजय विखे म्हणाले कि….

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- भाजप नेत्या पंकजा मुंडे किंवा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नेतृत्व केलं तरी आम्ही ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहोत.

असे प्रतिपादन खासदार सुजय विखे यांनी केले आहे. ऊसतोड कामगारांसाठी सर्वांनी मिळून काहीतरी करायला हवं. माझ्या, रोहित पवार, तसेच पंकजा मुंडे यांच्या शिक्षण संस्था आहेत,

आम्ही जर सर्व एकत्र आलो तर ऊसतोड कामगारांसाठी चांगलं काम होईल. सर्वांनी मिळून राजकीय पक्ष बाजूला ठेवून मनापासून हे करायला हवं. असे विखे यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना विखे म्हणाले कि, ‘पंकजा ताईंचा आणि आमचा जिल्हा मुळात ऊसतोड कामगारांचा उगम आहे. ऊसतोड कामगारांचा प्रश्न महाराष्ट्रासमोर आणण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं.

त्यांच्याबरोबर माझे आजोबाही त्या प्रक्रियेत होते. खरंतर त्यांच्यामुळेच कामगारांच्या या अडचणीदेखील आहेत ते समोर आलं. रोहित पवार, पंकजा मुंडे यांनी देखील मत मांडलं.

त्यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व केलं तर आमचा त्यांना पाठिंबा आहेच. कारण त्यांनी त्या गोष्टी फार जवळून पाहिल्या आहेत’, असेही विखे यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News