अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-घरगुती कारणाच्या वादातून एका महिलेने चक्क तहसील कार्यालयासमोरच आत्महत्या करण्याचा प्रयन्त केला.
मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे महिलेचा हा प्रयत्न फसला असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी कि,
श्रीगोंदा पोलीस स्टेशनला आलेला एका आदिवासी महिलेने पोलीस स्टेशनमधून अचानक बाहेर पळत तहसिल कार्यालयाच्या कंपाऊंड गेट शेजारी असलेल्या लिंबाच्या झाडावर चदली.
तसेच या महिलेने अंगातील साडी सोडून मी आता माझे जीवन संपावणार आहे. प्रशासनाने माझी दखल घ्यावी असे म्हणत गळफास घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र, सदर बाब श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल समीर सय्यद व हेड कॉन्स्टेबल अंकुश ढवळे यांनी पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने होणार अनर्थ टाळला.
दरम्यान या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. हा सर्व प्रकार घडत असताना संबंधित परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सदर महिलेला ताब्यात घेतल्याने, त्या महिलेचा जीव वाचला. कर्तव्यदक्ष पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com