तलाठ्याचा मनमानी कारभार; वृद्धाची जमीन लुबाडली

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- एका वृद्धाची जमीन परस्पर सरकारी जमीन म्हणून नोंद केल्याचा खळबळजनक प्रकार एका सरकारी बाबूने केला आहे. दरम्यान हा खळबळजनक प्रकार श्रीगोंदा तालुक्यातील घुगलवडगाव येथे घडला आहे.

याप्रकरणी बापू खंडू पाचपुते (७८ वर्ष) यांची जमीन घुगलवडगाव-देऊळगाव कामगार तलाठी सरिता देशमुखने परस्पर सरकारी जमीन म्हणून नोंद केली आहे.

मला न्याय मिळवून द्या यासाठी या वृद्धाने सरकारी कार्यालयाचे हेलपाटे मारले मात्र न्याय मिळाला नाही. याबाबत पाचपुते यांनी तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना अर्ज देऊन दुरुस्तीची मागणी केली आहे

अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की घुगल वडगाव येथील बापू खंडू पाचपुते या ७८ वर्षीय वयोवृद्धाचे दोन्ही मुले मृत्यू पावले आहेत.

त्यांना दोन सुना व नातवंडे आहेत.घरात कर्ते मुले हरपल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर म्हातारपणी पडली आहे. पाचपुते यांच्या गटातून कुकडी प्रकल्प गेला आहे,

परंतु त्यांच्याबरोबर इतरही शेतकऱ्यांच्या जमिनीतून कुकडी कालवा गेला आहे. परंतु गावातील पुढाऱ्यांनी तलाठ्यास हाताशी धरून फक्त पाचपुते यांचेच क्षेत्र सरकारी जमिनीत हस्तांतरित दाखवून त्यांची जमीन परस्पर गायब केली आहे.

या जमीन घोटाळ्याची दुरुस्ती करण्याची मागणी पाचपुते करत आहे. मात्र सरकारी अधिकाऱ्यांकडून या वृद्धाला छळले जात आहे.

पाचपुते यांनी याबाबत कंटाळून तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना अर्ज देऊन सात-बारा उताऱ्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा अर्जात दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe