कोर्टाने ‘ह्या’ ६ कारणांमुळे फेटाळला बाळ बोठेचा जामीन अर्ज

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याचा आज जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यामुळे बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बहुचर्चित रेखा जरे हत्या कांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे यांनी दि. ७ रोजी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

आज त्याच्या अटक पूर्व जामीन आर्जवर सुनावणी होऊन एम.आर नातू यांनी बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन खालील कारणामुळे फेटाळण्यात आला आहे.

बाळ बोठे च्या अटकेपूर्व फेटाळण्याची कारणे अशी

१) अर्जदार व अटक आरोपी व मयत यांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड मध्ये असे आढळून आले आहे कि घटनेच्या अगोदर एक महिन्यापासून ते आरोपी व मयत सतत संपर्कात असल्याचे दिसून येत.

२) सी.सी.टी.व्ही च्या रेकॉर्ड मधे गुन्ह्या दरम्यानच्या हालचालींवरून व गुन्ह्यामध्ये साक्षी दरांनी दिलेल्या जबाबांवरून अर्जदार व आरोपी यांचा गुन्ह्याचा संबंध असल्याचे दिसून येते .

३) गुन्ह्या मधील अटक आरोपी कडून जापत झालेली रक्कम रु. ६,२०, ००० यावरून अर्जदार विरुद्ध प्रथम दर्शनी पुरावा दिसून येतो व अर्जदार याचा सादर गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचे दिसून येते .

४) गुन्हा दाखल झाल्याचे दुसऱ्या दिवस पासून अर्जदाराकडे अपराधी पणाचे बोट जात असल्याचे दिसून आले. घटना गंभीर स्वरूपाची असून गळा चिरून हत्या केलेली आहे.

५) अर्जदाराचे म्हणणे असे होते कि त्याला ह्या गुन्ह्यात चुकीच्या पद्धतीने सूडाच्या भावनेने गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे म्हणणे कोर्टाने फेटाळले आहे . ६) सरकारी पक्षाचा युक्तिवाद , तपासी अंमलदार यांनी प्रथम दार्शनि गोळा केलेला तांत्रिक पुरावा , साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरून अर्जदाराचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment