अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- नेवासे सलाबतपूर येथील अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याबद्दल चाइल्डलाइनच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
चाइल्डलाइनचे प्रवीण श्याम कदम यांनी फिर्यादीत म्हटले आहे, २ डिसेंबरला अज्ञात व्यक्तीने चाइल्डलाइनच्या १०९८ या हेल्पलाइनवर फोन करून कळवले की, सलाबतपूर येथील एका १६ वर्षे वयाच्या मुलीचा विवाह २७ नोव्हेंबरला लावण्यात आला.
तपासाअंती बालविवाह झाल्याचे पुरावे संस्थेला मिळाले. मुलीच्या आई-वडिलांनी तिचा विवाह शेवगाव येथील दिनेश गंगाधर तेलुरे याच्याशी लावून दिला.
तेलुरे कुटुंबालाही मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना हा बालविवाह लावण्यात आला. त्यामुळे मुलीचे वडील, आई, तसेच दिनेश तेलुरे, गंगाधर व तारामती तेलुरे यांच्याविरुध्द तक्रार देण्यात आली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये