मंत्री तनपुरेंच्या हस्ते उदघाटन होणारा फलक समाजकंटकांनी तोडला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :-  राहुरी तालुक्यातील धानोरे येथील शिंदे दिघे वस्तीवर जाणारा रस्ता बर्‍याच दिवसांपासून वापरण्यास नादुरूस्त होता रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती.

नामदार प्राजक्त तनपुरे यांनी ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावले. ना. प्राजक्त तनपुरेंच्या पाठपुरावा आणि निधीतून पूर्ण झालेल्या

राहुरी तालुक्यातील धानोरे येथील शिंदे-दिघे वस्तीवर जाणार्‍या रस्त्याच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी लावलेल्या फलकाची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

धानोरे येथील शिंदे दिघे वस्तीवर जाणारा रस्ता नादुरूस्त होता. येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा मागील लोकप्रतिनिधी यांना निवेदन दिले होते. मात्र त्या निवेदनाला केराची टोपली मिळाली.

त्यांनतर येथील ग्रामस्थ यांनी ना. तनपुरे यांची भेट घेऊन रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी विनंती केली. ग्रामस्थांची विनंती लक्षात घेत तनपुरे यांनी रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि प्रत्यक्ष काम पूर्णही झाले.

काम पूर्ण झाले म्हणून येथील ग्रामस्थांनी तनपुरे यांना धानोरे येथे बोलून ग्रामस्थानी रस्त्याचे उद्घाटन केले. उद्घाटन दरम्यान लावलेले फलक काही अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News