अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- पाईपलाईन रोडवरील निर्मलनगर परिसरात सात ते आठ युवकांनी धुडगूस घालत एका कुटुंबास मारहाण करुन दुचाकी जाळल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी सात ते आठ युवकांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, निर्मलनगरच्या शिरसाठ मळा परिसरातील अलंकापूरी कॉलनीमध्ये राहणारे अरुण ठोकळ यांचा काही दिवसापुर्वी दीपक नामदेव सावंत, तुषार थोरवे, गजानन सावंत यांच्याशी किरकोळ वाद झाला होता.
या किरकोळ वादाच्या कारणावरुन सदरील तिघे व त्यांचे चार ते पाच अनोळखी साथीदार यांनी मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ठोकळ यांच्या घरी येवून चांगला धुडगूस घातला.
तोडफोड करीत शिवीगाळ केली व ठोकळ यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी पेटवून दिली. या मारहाणीत ठोकळ हे जखमी झाले आहे.
याबाबत मंदा अरुण ठोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात दीपक सावंत, तुषार थोरवे, गजानन सावंत यांच्यासह चार ते पाच अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये