नवीन वर्षांत विधान परिषदेच्या 8 जागांसाठी निवडणूक अहमदनगरचाही समावेश !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- नवीन वर्षात विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आठ मतदारसंघांत निवडणूक होणार आहे. नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य मंडळी या निवडणुकीत मतदार असतात. त्यामुळे चुरशीची लढत होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना ‘भाव’ येणार आ आहे.

मुंबई महापालिकेतून निवडून आलेले रामदास कदम (शिवसेना) व भाई जगताप (काँग्रेस), नागपूरचे गिरीश व्यास (भाजप), सोलापूरचे आमदार प्रशांत परिचारक (अपक्ष-भाजप पुरस्कृत),कोल्हापूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे गृहराज्यमंत्री बंटी पाटील (काँग्रेस),

धुळे-नंदूरबारमधून अलीकडेच पोटनिवडणुकीत निवडून आलेले अमरिश पटेल (भाजप), अकोला-बुलढाणा-वाशीमचे गोपीकिसन बजोरिया (शिवसेना), नगरचे अरुण जगताप (राष्ट्रवादी ) हे आठ आमदार पुढील वर्षी निवृत्त होत आहेत.

या निवडणुकीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य हे मतदार असतात. राज्यातील बहुतांशी नगरपालिकांची मुदत ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संपत आहे.

ऑक्टोबरच्या सुरुवातीला नगरपालिकांची निवडणूक होईल. नगरपालिकांची निवडणूक झाल्यावर लगेचच विधान परिषदेची निवडणूक होईल. यामुळे चुरशीची लढत होणाऱ्या विधान परिषदेच्या मतदारसंघातील मतदारांना भाव येऊ शकतो.

दरम्यान या निवडणुकांत नगर स्थानिक स्वराज्य मतदार संघाचाही समावेश असल्याने नव्या वर्षात नगर शहर व जिल्ह्याला नवा आमदार मिळणार आहे.

अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील विद्यमान आमदार अरुणकाका जगताप यांनाच पुन्हा तिसऱ्यांदा संधी मिळते की, त्यांचे व्याही व राहुरीचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? उतरले तर ते कोणत्या पक्षाकडून, याची उत्सुकता व्यक्त होत आहे.

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे राजकारण रंगात असल्याने त्याचा नगरच्या या निवडणुकीवर परिणाम होणार की नेहमीप्रमाणे ‘सोधा’ पक्ष आपसात ठरवून निवडणूक काढणार, याचे कुतूहल व्यक्त होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment