अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज गुरुवारी साईदर्शनासाठी शिर्डी येथे आले होते. साईबाबाच्या दर्शनासाठी आलेल्या चंद्रकांत पाटलांनी यावेळी जोरदार राजकीय फटकेबाजी केली.
यावेळी पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विषयी विचारले असता कोण संजय राऊत? असा उपरोधिक सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांची चांगलीच खिल्ली उडवली.
तसेच यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा देखील चांगलाच समाचार घेतला. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट केला होता.
त्यावर चंद्रकांत पाटील यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, अजित पवारांमध्ये एवढी ताकद असती तर राज्यात 80 तासांचं सरकार आलं त्यावेळी त्यांनी आणलेले आमदार का नाही टिकवले.
ते आमदार अजित पवारांना टिकवता आले असते तर सरकार राहिलं असतं, अशा शब्दात समाचार घेतला. भाजपचे आमदार नाराज असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत.
तसंच राष्ट्रवादीत लवकरच मोठी महाभरती होणार असल्याचा दावा ते करत आहेत. यावर तुम्ही सरकार चालवा आम्ही विरोधी पक्ष सांभाळू”, असं पाटील म्हणाले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये