अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- अवैधवणे वाळू उपसा करून स्वत:च्या फायद्यासाठी वाळूसा साठा केल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी धडक कारवाई करत २२ ब्रास वाळूचा साठा व ट्रॅक्टर, ट्रॉली असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी दोघंावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील मुळा नदीपात्रात विना परवाना जेसीबी व ट्रक्टरच्या सहाय्याने वाळूचे उत्खनन करून
त्याचा साठा केल्याप्रकरणी पोलिसंानी राजू डोंगरे (रा.जांबुत ता.संगमनेर) सरेश सुदाम मोरे (रा.मोरवाडी ता.संगमनेर) या दोघांसी त्यांचे दोन साथिदारांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी ९२ हजार ४०० रूपयांचा २२ ब्रास वाळूचा साठा,३ लाख ५५ हजारांचा लाल रंगाचा महिंद्रा ५७५ डीआय कंपनीचा ट्रॅक्टर, ट्रॉली व त्यावर एक वाळू चाळण्याची चाळणी असा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शरदचंद्र गोरक्षनाथ नांगरे यांनी पारनेर पोलिसांत फिर्याद दिली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये