धार्मिक कामासाठी निधी मिळवा या मागणीसाठी मुख्यमंत्र्याना साकडे

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची घोषणा केली.

या पार्श्वभूमीवर स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध प्राचीन मंदिरांच्या जीर्णोध्दारासाठी निधी मिळावा म्हणून मागणी केली.

पौराणिक इतिहासाची साक्ष देणार्‍या कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध प्राचीन मंदिरांच्या जीर्णोद्धार कामासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दयावा, अशी मागणी कोल्हे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, मोठी ऐतिहासिक परंपरा असलेली प्राचीन मंदिरे कोपरगाव विधानसभा मतदार संघात आहे. या मंदिरांची अवस्था खुपच दयनीय झालेली आहे.

पौराणिक इतिहासाची साक्ष देणार्‍या या वास्तु खर्‍या अर्थाने आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. यांची जपवणुक करणे गरजेची बाब आहे. त्याकरीता राज्यशासनाने या प्राचीन मंदिरांच्या जिर्णोध्दार कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी सौ. कोल्हे यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment