गड किल्ल्यांकडे सरकारचे दुर्लक्ष; माजी आमदाराचे मुख्यमंत्र्याना पत्र

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-  गड किल्ले, पुरातन मंदिरे आणि धर्मशाळा यांचे जतन करण्याचे व संवर्धन करण्याचे काम व जबाबदारी पुरातत्व विभागाची आहे. मात्र याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केला आहे.

तसेच या गड किल्ल्यांच्या संवर्धनसाठी त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तातडीने पत्रही पाठविले आहे. गड किल्ले, पुरातन मंदिरे आणि धर्मशाळा यांचे जतन करण्याचे व संवर्धन करण्याचे काम व जबाबदारी पुरातत्व विभागाला जिकरीचे वाटते, नव्हे तर ते याबाबीकडे दुर्लक्ष्य करत आहेत.

हरीशचंद्रगड, अमृतेश्वर मंदिर, टाहाकारी मंदिर हेमाडपंथी शैलीतील मंदिरे आणि दीपमाळ, बुरुज, कोसळण्याच्या स्थितीत आहेत. तर अतिवृष्टीच्या काळात ही मंदिरे गळतात. मंदीराचे दगड सरकली आहेत.

पुरातत्व खाते स्थानिकांना यात हस्तक्षेप करू देत नाही. त्यामुळे या वास्तू मोडकळीस आल्या असून हरीशचंद्रगडावरील विठ्ठल रुख्मिणी मातेची मूर्ती चोरीला जाऊनही पुरातत्व खाते साधी चौकशी व पोलीस केस करत नाही, त्या अर्थी त्यांना या वास्तूबद्दल आत्मीयता नाही.

गिरीप्रेमींनी, स्थानिक ग्रामस्थांनी आपणाकडे याबाबत ओरड केली असून याची मुख्यमंत्री यांनी चौकशी करून या वास्तूंचे खास बाब म्हणून निधी उपलब्ध करून जतन करावे व तातडीने मंदिर दुरुस्तीसाठी व सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार पिचड यांनी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe