‘ते’ आता माजी आमदार झालेत प्रा. गाडे यांचे कर्डिले यांच्यावर टीकास्त्र

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :-लांबणीवर पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्याने ऐन हिवाळ्यातही गावोगावचे राजकारण चांगलेच तापले आहे.

नगर तालुक्यातील महाविकास आघाडीने कार्यकर्त्यांना एकत्रित करत कोणत्याही परिस्थितीत नगर तालुक्यातून भाजपाचा सुपडासाफ करायचाच, अशी वज्रमुठ आवळली आहे.

दरम्यान, शिवाजी कर्डिले आता माजी आमदार झाल्याने त्यांचे नगर तालुक्यात काहीच अस्तित्व राहिले नाही. असा सणसणीत टोला नगर तालुका महाविकास आघाडीचे नेते प्रा. शशिकांत गाडे यांनी लगावला.

नववर्षात नगर तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर नगर तालुक्यातील महाविकास आघाडीच्यावतीने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे मार्गदर्शन करत होते. ग्रामपंचायतीपाठोपाठ सोसायट्या, बाजार समिती व जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे.

गत बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला होता. महाविकास आघाडीची संधी थोडक्यात हुकली. परंतु, आता ते माजी आमदार झाल्याने तालुक्यातील जनता त्यांना स्वीकारणार नाही.

जिल्हा बँक व बाजार समिती जिंकायची असेल तर ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवावा लागेल, असे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment