अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- जुन्या, वापरलेल्या वस्तू खरेदी विक्रीसाठी OLX हा पर्याय सर्वाना माहिती आहे. मात्र या OLX वर एक अजबच गोष्ट विक्रीसाठी उपल्बध झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.
ओएलएक्स या वस्तू विक्रीच्या वेबसाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीमधील कार्यालयाचे फोटो टाकून ते विक्रीला काढल्याची जाहिरात दिली. त्यासाठी साडेसात कोटी रुपयांची बोली लावली.
पोलिसांनी आता ती ऍड काढून टाकली. एफआयआर नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाराणसीतील संसदीय कार्यालय व्हिला हाऊस म्हणून विक्रीला काढले. चार रुम आणि चार बाथरूम असणाऱ्या या वास्तूची कारपेट एरीया सहा हजार 500 फूट आहे, अशी माहिती फोटोसह देण्यात आली.
पोलिसांनी आता ही जाहिरात काढून टाकली असून या प्रकरणात चार जणांना अटक केली आहे. ही विक्री करणाऱ्याचे नाव लक्ष्मिकांत ओझा आहे. त्याने या वास्तूचे आतील फोटोही टाकले आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये