नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपा नेते अमित शाह यांनी गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्यानंतर २०१४ साली अमित शाह यांनी हे पद सांभाळले होते.
त्यांना गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदावर बिनविरोध निवडण्यात आलेले होते. मोदींनी पंतप्रधानपदाचा पद्भार घेतल्यानंतर हे पद सोडले होते. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार परिमल नथवाणी हे तत्कालीन उपाध्यक्ष होते आणि त्यांनी शाह यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता.
तत्पूर्वी १५ सप्टेंबर २००९ रोजी तत्कालीन काँग्रेस नेते नरहरी अमीन यांच्याकडून मोदी यांनी या पदाचा पद्भार घेतला होता. यानंतर अमीन भाजपात सहभागी झाले होते. गुजरातचे माजी गृहमंत्री तथा मोदींचे सहकारी अमित शाह यांना गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते.
नवीन अध्यक्षासाठी गुजरात क्रिकेट असोसिएशनला थोडो दिवस वाट पहावी लागणार आहे. २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बोर्ड आणि राज्य असोसिएशनच्या सर्व अयोग्य पदाधिकाऱ्यांना आपले पद सोडण्याचे आदेश दिलेले होते.
याच्या अनुषंगाने अनेक राजकारणी लोकांनी आपली पदे सोडली होती. राजीनामा देणाऱ्यांमध्ये शरद पवार (मुंबई क्रिकेट असोसिएशन), राजीव शुक्ला (उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन), ज्योतिरादित्य सिंधीया (मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन) आणि रणजीत बिस्वाल (ओरिसा क्रिकेट असोसिएशन) आदींचा समावेश होता. परंतु अमित शाह अजूनही या पदावर कायम होते.
- Jio Finance Share Price : मुकेश अंबानी यांच्या कंपनीचे शेअर घ्या आणि श्रीमंत व्हा !
- खासदार निलेश लंकेंच्या तालुक्यात येणार श्रीलंकेचा मुथय्या ! एमआयडीसीत साकारणार सर्वात मोठा प्रकल्प
- मुथय्या मुरलीधरन करणार अहिल्यानगरमध्ये 1635 कोटींची गुंतवणूक !
- पॅन कार्डमध्ये मोठा बदल ! लॉन्च झाले नवे पॅनकार्ड… काय बदलणार?
- MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 320 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा