गोपीचंद पडळकरांचा बोलविता धनी वेगळाच आहे… ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची टीका

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- “पा­तळ घालून नौटंकी करणारे गोपीचंद पडळकरांसारखे बरेच आहेत. त्यांना शरद पवार यांच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यांचा बोलविता धनी वेगळाच आहे,” अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

पडळकर यांनी खासदार संजय राऊत हे शरद पवार यांचे चमचे आहेत, असे विधान केले होते. त्यानंतर हसन मुश्रीफ यांनी हे भाष्य केले आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले, “धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी पडळकर यांनी बारामतीमध्ये आंदोलन केले होते.

तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेऊन आमचे सरकार आले की मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आरक्षण देऊ, असा शब्द दिला होता. पण पाच वर्षांच्या सत्ता काळात त्यांना आरक्षण देता आले नाही.

तेव्हा पडळकर हे कोणाचे चमचे होते ? आताही धनगर समाजाचा विश्वासघात करून त्यांनी आमदारकी मिळवलेली आहे. “कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर गेलेले प्रमुख आमच्या संपर्कात आहेत.

ते लवकरच स्वगृही परत येतील,” असा दावा मुश्रीफ यांनी केला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे हे माझे मित्र आहेत. मात्र त्यांच्या पक्षात येण्याबाबत चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment