जामखेड :- “काही दिवसांपुर्वी एका व्यक्तीला शिकारीची हौस आलेली. आपल्या घरचं जनावर मरायला लागलं तर त्याला पाहूण्याच्या दारात नेऊन दावणीला बांधायचा सल्ला देणारेच शिकारीसारख्या गोष्टी करू शकतात.
असो, त्यांना कुणीतरी सांगा माणूस असो वा जनावर आम्ही जगवायच्या गोष्टी करतो.” अशी खोचक टीका रोहित पवार यांनी पालकमंत्री राम शिंदेंवर केली आहे.
दरम्यान काही महिन्यांपूर्वी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमवेत असलेले पालकमंत्री शिंदे पथक जिल्ह्याबाहेर गेल्यावर पाथर्डी येथील विश्रामगृहावर आले होते.
तेथे काही शेतकरी त्यांना भेटायला आले होते. दुष्काळामुळे चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी होती, पण शहरी भागात अशा छावण्या सुरू करण्यास अडचणी येत असल्याचे सांगताना शिंदे यांनी पाहुण्यांकडे (नातेवाईक) जनावरे नेऊन घालण्याचा सल्ला दिला.
त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर राजकीय क्षेत्रातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सोशल मीडियावरही अनेकांनी शिंदेंच्या वक्तव्यावर टीका केली होती. याच वक्तव्याचा आधार घेत रोहित पवारांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.
रोहित पवार हे नगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातुन निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा सामना रंगणार आहे. या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.
- साईच्या नगरीत आजपासून राष्ट्रवादीचे मंथन शिबीर ! अजित पवार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांची उपस्थिती
- Ahilyanagar News : नरभक्षक बिबट्या जेरबंद, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
- Plastic Tea Cup : प्लास्टिक कपातून चहा पिणे योग्य आहे का ? वाचा काय आहेत परिणाम ?
- शेवगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये आनंदोत्सव, शेतकरी सुखावले
- राहुरी तालुक्यात बिबट्यांचे वाढते प्रमाण चिंताजनक ! २५० पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर