अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा या अभियानात अहमदनगर मनपाने भाग घेतला आहे.
मागील वर्षी महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये भाग घेतला होता. लोकसहभागामुळे त्यात महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी केलेल्यामुळे देशात ४० वा क्रमांक मिळवला. त्यामुळे स्वच्छतेत नगरचे नाव देशपातळीवर झळकले.
स्वच्छतेमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडते.
त्यामुळे यावेळी देखील नगरकरांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा या उपक्रमांसाठी साथ देऊन नगर शहर देशात टॉपटेन करावे, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये