शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांचे निधन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- शिवसेनेचे माजी खासदार आणि परळ ब्रँड अशी ओळख असलेले मोहन रावले यांचे गोव्यात निधन झाले आहे. ते ७२ वर्षांचे होते.

मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ५ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. मुंबईतील परळ-लालबाग भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे रावले हे निकटवर्तीय समजले जात. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत ही माहिती दिली. मोहन रावले गेले, असे सांगत कडवट शिवसैनिक, दिलदार दोस्त आणि शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले नेते असे वर्णन करत संजय राऊत यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मोहन रावले यांची ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच ओळख होती. मोहन रावले पाच वेळा खासदार झाले, मात्र अखेरपर्यंत ते सगळ्यांसाठी मोहनच राहिले अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment