अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- अंधाराचा फायदा घेऊन वाळूउपसा करणाऱ्यांना श्रीगोंदा तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी आज चांगलाच दणका दिला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे शिवारातील माळवाडी येथील घोडनदीपत्रात आज पहाटेच्या चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान तहसीलदारांनी धाड टाकली.
ठिकाणी अवैध वाळूउपसा करणाऱ्या अंदाजे चाळीस लाख रुपये किंमतीच्या ४ बोटी उध्वस्त केल्या तसेच चोरटी,बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारी अंदाजे दहा लाख रुपये किंमतीची एक ट्रक वाळूसह बेलवंडी पोलीस स्टेशनला जमा केली आहे.
सदर कारवाई ही श्रीगोंदा तहसीलदार प्रदीपकुमार पवार,मंडळ अधिकारी प्रशांत कांबळे,मंडळ अधिकारी भारत चौधरी,तलाठी मिलिंद पोटे,तलाठी पवन शेलार,तलाठी स्वप्नील होळकर या महसूल पथकाने केली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये