अहमदनगर ब्रेकिंग कारच्या धडकेत महसूल उपायुक्तांचे वडील जागीच ठार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- बेशिस्त वाहन चालविणे, वेगाची मर्यादा न पाळणे यामुळे अनेकदा अपघात घडतात. यातच जिल्ह्यात अपघातांचीए सत्र सुरूच आहे.

नुकत्याच एका अपघातात एका सरकारी अधिकाऱ्याचे वडील जागीच ठार झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील पळवे मठवस्ती येथे पुणे हून नगरकडे भरधाव वेगाने जात असणा-या एल कारने ह.भ.प महादेव भाऊसाहेब गाडिलकर (वय ८५) यांना जोराची धडक दिल्याने गाडिलकर यांचा जागीच मृत्यू झाला.

फिर्यादी रामदास तरटे यांनी गाडी चालक श्रेणीक दोशी यांचे वर सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मयत गाडीलकर यांच्या निधनाने वारकरी संप्रदायमध्ये शोककळा पसरली आहे.

ते गोरक्षनाथ महादेव गाडिलकर (उपविभागीय महसूल उपायुक्त नाशिक) यांचे वडील होते. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार डी. बी शेरकर करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment