बिनविरोध! ग्रामपंचायत निवडणूक बाबत ग्रामस्थांनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. ठिकठिकाणी या विषयाच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच सध्या जिल्ह्याबरोबरच राज्यात बीविरोध निवडणुकांचा विषय देखील चांगलाच चर्चात आहे.

यातच एक महत्वपूर्ण बातमी समोर येत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील महत्वपूर्ण समजणारी ग्रामपंचायत ढवळगाव मध्ये बिनविरोध निवडणूक होण्यासाठी गावातील सर्व पॅनल व ग्रामस्थांनी बैठक घेतली.

त्यामध्ये गावातील सर्वांच्या सहमतीने शासनाने विहित केलेल्या वार्ड रचनेनुसार व आरक्षणानुसार गावातील ज्येष्ठ नागरिकांनी व तरुणांनी काही नावं सुचवली त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यामध्ये सर्वानुमते बिनविरोध निवडून दिलेल्या सदस्यांची नावे सौ. प्रतिक्षा विजय शिंदे, सौ. सारिका रविंद्र शिंदे श्री. अजित नामदेव लोंढे, सौ. मनीषा राहुल बोरगे सौ. बायडाबाई गणेश शिंदे, कु. गणेश राजाराम ढवळे, दादाभाऊ बबन ढवळे,

बाळु सीताराम शिंदे, अजय दादाभाऊ वाळुंज यामध्ये गावातील सर्व राजकीय पक्षातील गटांचा कोणत्याही प्रकारचा विचार न करता गावात एकोपा टिकवा या हेतूने बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे