अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- ३३ वर्षीय महिलेस लग्नाचे अमिष दाखवून तिचे इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या पोलिसाविरोधात घारगाव ता. अकोले पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर महिलेचा तिच्या संमतीशिवाय गर्भपात करणाऱ्या डॉक्टरसह चोघांविरोधात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुमठेगाव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर येथील ३३ वर्षीय घरकाम करणाऱ्या महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे.
सदर महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घारगाव पोलीस स्टेशनमध्ये नेमणुकीस असणाऱ्या पोलीस शिपाई सुनील यशवंत रत्नपारखी याने आपणास माझा घटस्फोट झाला आहे, असे खोटे सांगून मला लग्नाचे अमिष दाखवून घारगाव येथे आणुन माझे इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीरसंबंध केले.
शिवाय माझ्या १० वर्षाच्या मुलीशी लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले एवढेच नव्हेतर मी प्रथम गर्भवती राहिल्यानंतर मला गोळ्या घरीच गर्भपात केला. दुसऱ्या वेळेस गर्भवती राहिल्यानंतर निरामय हॉस्पिटल, आळे, ता. जुन्नर, जि.पुणे या ठिकाणी नेवून माझ्या संमतीशिवाय आरोपी डॉ. व्ही. जी. मेहेर यांनी गर्भपात केला.
व तसेच पोलीस शिपाई सुनील रत्नपारखी याने सदर गर्भाची विल्हेवाट लावली. शिवाय अमोल कर्जुले (पूर्ण नाव माहीत नाही) रा. अकोले, जि. नगर आणि अमोल कर्जुले याची आई (पूर्ण नाव माहीत नाही), रा. अकोले यांनी मला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करुन घराच्या बाहेर हाकलून लावले.
सदर प्रकार हा घारगाव, ता. संगमनेर येथे दि. ११.१.२०२० रोजी २० दिवसानंतर ते दि. २०.११.२०२० रोजी ७.३० वा. दरम्यान घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी पोशि सुनील यशवंत रत्नपारखी, (नेमणुक घारगाव पोलीस स्टेशन) डॉ. व्ही. जी. मेहेर निरामय हॉस्पिटल,
आळे, ता. जुन्नर. अमोल कर्जुले व त्याची आई (पूर्ण नाव माहीत नाही) दोघे रा. अकोले, जि. नगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी डीवायएसपी राहुल मदने हे स्वतः या प्रकरणाचा तपास करत आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये