अहमदनगर पोलिसांची दमदार कारवाई; परराज्यात जाऊन चोरट्यांना पकडले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- नऊ लाख रुपये किंमतीच्या कापसाची फसवणूक करणाऱ्या 3 आरोपींना नेवासा पोलिसांनी थेट गुजरात येथुन ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांनी यावेळी गुन्ह्यातील ट्रक व सर्व कापुस जप्त केला आहे.

याबाबद अधिक माहिती अशी की,दि.9 नोव्हेंबर 2020 रोजी कापुस व्यापारी संदेश शरदलाल फिरोदीया यांनी नेवासा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली होती कि, 9 लाख 13 हजार 260 रुपये किंमतीचा कापुस ट्रक मध्ये भरुन पटेल कॉटन इंडस्ट्रीज (हळवद रोड धागद्रा जि. सुरेंद्रनगर) येथे नेवुन खाली करणे अपेक्षीत होते.

मात्र तसे न करता आरोपीनी संगणमत करुन परस्पर विल्हेवाट लावुन फसवणुक केली आहे.या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास नेवासा पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अभिनव त्यागी हे करत होते.

दरम्यान याप्रकरणातील तीन आरोपी कान्हा उर्फ देवल दिनेशभाई डाभी (वय 25वर्षे) (रा गोकुळधाम सोसायटी, दरेड ता.जि. जामनगर राज्य गुजरात), बंदिया राम सोमात (वय 23 वर्षे) (रा.सेल नं 04 आर्शिवाद सोसायटी , रणजीत सागर रोड , ता.जि जामनगर, गुजरात)

व भरतभाई आंबाभाई मांगुकिया (वय 48 वर्षे) (रा- न्यु कतारगाव, वरीयाव रोड, जि. सुरत राज्य गुजरात) या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ट्रक तसेच बेंडवान ता. डेडीयापाडा जि. नर्मदा,राज्य गुजरात येथुन गुन्ह्यातील 08 लाख 48 हजार रुपये किंमतीचा कापुस जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपींवर धरणगाव पोलीस स्टेशन जि.जळगाव येथे गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News