विनायकनगरमध्ये धाडसी घरफोडी साडेआठ लाखांचा ऐवज लंपास

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- अज्ञात चोरट्यांनी शहरातील विनायक नगर परिसरातील एका बंगल्यात धाडशी घरफोडी केली असून, यात तब्बल रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण साडेआठलाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्हाभरासह शहरातील केडगाव, सावेडी, बोल्हेगाव, तपोवन रोड, पाईप लाईन, विनायक नगर आदी उपनगरांमध्ये चोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे.

अनेक भागात तर दिवसा देखील घरफोडी करण्याच्या घटना घडत आहेत. चोरटे दररोज नागरिकांच्या घरातून मोठा ऐवज लंपास केरत आहेत.

नागरिकांनी या चोरट्यांचा चांगलाच धसका घेतला असून, अनेक नागरिक त्या त्या परिसरात रात्रीची गस्त घालत आहेत.तरी पोलिसांनी या चोरट्यांचा वेळीच बंदोब्सत करावा अशी मागणी पुढे येत आहे.

शहरातील विनायक नगर परिसरातील जैन धर्मस्थानकाजवळ मुकेश मोतीलाल लोढा हे राहतात.लोढा कुटुंबिय बाहेरगावी गेल्याने त्यांचा बंगला बंद होता.

नेमका हाच फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी लोढा यांच्या बंगल्यात घुसून चोरी केली.चोेरट्यांनी बंगल्यात घुसल्यानंतर घरातील सर्व साहित्याची उचकापाचक केली.

यात अडिच लाखांची रोख रक्कम व कपाटात ठेवलेले २१ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले. शुक्रवारी सायंकाळी लोढा कुटंबिय परत आल्यानंतर त्यांना आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आले.

त्यानंतर त्यांनी याबाबत कोतवाली पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe