शेतकरी विरोधी कायद्याच्या निषेधार्थ वंचितचे आंदोलन

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- महाराष्ट्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्यात दुरुस्ती करणारा अद्यादेश त्वरित काढावा. तसेच हिवाळी अधिवेशनात शेती मालाला

हमीभाव मिळण्यासाठी तरतूद करावी यासह शेतकर्‍यांच्या इतर मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात धरणे आंदोलन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार हे आंदोलन पार पडले. शेतकरी विरोधी जुलमी कायदे मंजूर करणार्‍या केंद्र व राज्य शासनाचा निषेध करीत हे जुलमी कायदे रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

तसेच रेल्वेच्या खाजगीकरनाचा निर्णय केंद्र सरकारने ताबडतोब रद्द करावा. दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या आजच्या शेतकरी बांधवांच्या आंदोलनाने भारतीय रेल्वेच्या

खाजगीकरनाला व मोदी सरकारच्या सर्व सार्वजनिक सेवांच्या खाजगीकरनाला विरोध करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले व या शेतकरी आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर करण्यात आला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment