अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- अज्ञात दोन चोरट्यांनीघरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवून घरातील रोख रक्कम व दागिने असा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बेलवंडी येथे घडली.
याबाबत सविस्तर असे की, श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी गावात प्रीति सागर इथापे या राहतात शुक्रवारी अज्ञात दोन चोरट्यांनी त्यांच्या त्यांच्या किचनच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला

file photo
तसेच फिर्यादी प्रीति इथापे यांना चाकुचा धाक दाखवत घरातील सर्व सामानाची उचकापाचक करून कपाटात ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने तसेच फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसूत्र व मोबाईल असा एकूण १ लाख ९९ हजारांचा ऐवज जबरदस्तीने काढून नेला.
याबाबत प्रीति सागर इथापे यांनी बेलवंडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com