तरी देखील मास्क हाच रामबाण उपाय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- “लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणं हा सर्वात मोठा रामबाण उपाय आहे. लस किती काळापर्यंत आपल्याला सुरक्षा देईल हे येणाऱ्या काळातच निश्चित होईल.

त्यामुळे मास्क लावणं तर सर्वात सोप आहे. म्हणून मास्क लावणं आणि हाताच्या स्वच्छतेवर लक्ष देणं हे आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. असे मत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले आहे.

मास्क लावणे आणि हात धुणे हे आपल्यासाठी सर्वाधिक गरजेचे असून, जर समजा लस आलीच नसती तरी आपल्याला हे करणे गरजेचेच होते. त्यामुळे स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुरक्षेसाठी मास्क लावायला कधीही विसरु नका.

” कोविड १९ प्रतिबंधक लस घेणे हे हितकारक आहे. जरी आधी कोविड १९ चा संसर्ग होऊन गेला असेल तरी ठरावीक मुदतीत या लशीच्या दोन मात्रा घेणे हिताचे राहील.

कोविड १९ लसीची कुणावर सक्ती केली जाणार नाही. पण लस घेतलेली केव्हाही चांगले असेल. ती अर्धवट मात्रेत घेऊ नये तर पूर्ण दोन मात्रा घ्याव्यात. त्यामुळे त्या व्यक्तीचे कोरोनापासून संरक्षण होईल व इतरांनाही त्याची बाधा होणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe