नाताळच्या धर्तीवर शिर्डीत मर्यादित भाविकांना मिळणार दर्शन,नवीन नियमावली जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- नाताळच्या सुट्यांमध्ये शिर्डीतील वाढती गर्दी लक्षात घेऊन साई संस्थानने नवी नियमावली जाहीर केलीय.

साई भक्तांना आता दर्शन काउंटरवर पास न मिळता संस्थानाच्या वेबसाईटवर आरक्षित करावा लागणार आहे. पैसे भरून घेतलेला दर्शनपास पाच दिवस आणि मोफत दर्शनपास आरक्षण केल्यापासून दोन दिवस उपलब्ध राहील.

मार्गदर्शक सूचनांच पालन करून जास्तीत जास्त १२,००० भाविक दर्शन योजनेचा लाभ घेऊ शकतील. नाताळ सुट्यांमधील गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाईन पासशिवाय भाविकांना दर्शन मिळणार नाही. संस्थानाच्या वेबसाईटवरती दर्शन पास मिळतील. दररोज १२,००० भाविकच दर्शन घेऊ शकणार आहेत.

लॉकडाऊन काळात बंद करण्यात आलेले शिर्डी साईबाबा मंदिर राज्य सरकारच्या आदेशानंतर पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुले करण्यात आले. कोरोनाच्या काळात सहा हजार भाविक दर्शन योजनेचा लाभ घेत होते.

त्यानंतर जवळपास आठ ते नऊ हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी योजना आखण्यात आली.आता नाताळच्या धर्तीवर शिर्डी संस्थानाने नवी नियमावली जाहीर केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment