‘त्या’ पतीपत्नीस लुटणारा जेरबंद उस्मानाबाद येथून घेतले ताब्यात

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :-मोटारसायकलवरून पती पत्नीस पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मोटारसायकलवरून येत लुटणाऱ्यापैकी एकास उस्मानाबाद येथून जामखेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रकाश उर्फ पक्या नाना शिंदे असे त्या आरोपीचे नाव आहे.  ही कारवाई अहमदनगर एलसीबीच्या पथकाने केली. याबाबत सविस्तर असे की,

की, खर्डा ते जामखेड रस्त्याने दुचाकीवर येत असताना पाठीमागून येऊन पत्ता विचारण्याचा बहाणा केला. या दरम्यान दुचाकीला चोरट्यांनी त्यांची दुचाकी आडवी लावली.

फिर्यादी व पतीस यांना ढकलून देऊन चाकूचा धाक दाखवून गळ्यातील कानातील दागिने, मोबाइल व रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली.

याप्रकरणी झुलेखा चंदुलाल पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलिस ठाण्यात लूट प्रकरणी गुन्हा दाखल केला हेाता.

या गुन्ह्यात लुटलेला सर्व ऐवज प्रकाश उर्फ पक्या नाना शिंदे (रा. पिंपळगाव फाटा ता. वाशी जि. उस्मानाबाद) याच्याकडे असल्याची माहिती पो. नि.अनिल कटके यांना गोपनीय माहिती मिळाली होती.

त्या माहितीनुसार कटके यांनी त्यांच्या पथकाला त्यांनी दिल्या. त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यात जाऊन आरोपी प्रकाश शिंदे याचा शोध घेऊन त्याला मुद्दामालासह ताब्यात घेतले.

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि अनील कटके यांच्या सूचनेनुसार पोहेकॉ विश्वास बेरड,

पोना शंकर चौधरी, रणजित जाधव, रोहिदास नवगिरे, रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, चापोना कुसळकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment