अण्णा म्हणतात वय, सुरक्षा आणि करोनाची स्थिती लक्षात घेता आंदोलनात सहभाग घेता येणार नाही !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- दिल्लीच्या सीमेवर गेल्या 24 दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरुच आहे. नव्या कृषी कायद्यांना या शेतकऱ्यांचा विरोध आहे. याबाबत सरकारकडून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मात्र, अद्याप सरकारला त्यावर यश मिळालेलं नाही. आज दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी राळेगणसिद्धी येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये पंकज प्रकाश श्रीवास्तव (बिहार), मोहित शर्मा (दिल्ली), राजरतन शिंदे, प्रदिप मेटी, किरणकुमार वर्मा,

सतिशकुमार राज पुरोहित (कर्नाटक) यांचा समावेश होता. शिष्टमंडळ म्हणाले कि, दिल्ली येथे केंद्र सरकार आंदोलनकर्त्या शेतक-यांना विविध प्रकारे त्रास देत आहे. या आंदोलनात २२ शेतकरी आतापर्यंत शहिद झाले आहेत. हजारे यांनी दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनात सहभाग घेतला तर आंदोलनाची ताकत निश्चितच वाढेल.

आपल्याकडे संपूर्ण देश दुसरे गांधी म्हणून पाहत आहेत व तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहेत. अशा भावना शेतक-यांच्या शिष्टमंडळाने व्यक्त केल्या. या वेळी हजारे म्हणाले, माझा केंद्र सरकारबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघर्ष सुरूच आहे. स्वामिनाथ आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव (मिळावा.

निवडणूक आयोगाप्रमाणे कृषीमुल्य आयोगाची स्थापना करावी यासह इतर मागण्यांसाठी गेल्या तीन वर्षांपासून आपला लढा सुरू आहे. केंद्र सरकारला अनेकदा पत्रव्यवहारही केला आहे. सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्याची गळ त्यांनी हजारे यांना घातली.

मात्र, दिल्लीतील कडाक्याची थंडी, आपले वय, सुरक्षा आणि करोनाची स्थिती लक्षात घेता हे शक्य होणार नसल्याचे सांगत हजारे यांनी त्यांची समजूत काढली आहे.दरम्यान अण्णा हजारे यांनी आपल्या जुन्या मागण्यांसाठी दिल्लीत आंदोलन करण्याची परवानगी हजारे यांनी सरकारकडे मागितली आहे.

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ रविवारी राळेगणसिद्धीला आले होते. त्यांनी हजारे यांना दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. मात्र, हजारे स्वतंत्रपणे आंदोलन करणार आहेत. दिल्लीत आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. जंतर-मंतर किंवा रामलीला मैदानाचे पर्याय त्यांनी सूचविले आहेत.

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील ११ जणांचे एक शिष्टमंडळ राळेगणसिद्धी येथे आले होते. या आंदोलनात हजारे यांनी सहभागी व्हावे, अशी विनंती त्यांनी केली. हजारे यांनी ऐकले नाही तर राळेगणसिद्धीमध्येच थाळीनाद आंदोलन करण्याचाइशाराही त्यांनी दिला होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment