अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यात कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहीम राबविण्यासाठी प्रांताधिकारी अनिल पवार यांचे अध्यक्षतेखाली कृती दल स्थापन करण्यात आले आहे. या मध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे हे समन्वयक असणार आहेत.
तर तहसीलदार प्रशांत पाटील, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत जमधडे, गटविकास अधिकारी जालिंदर आभाळे, गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे, याशिवाय आरोग्य क्षेत्रात काम करणार्या संघटना यांचा समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील 1414 डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येईल, अशी माहिती प्रांताधिकारी अनिल पवार यांनी दिली.
यामध्ये तालुका आरोग्य विभागातील 14, बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील 150 व खाजगी 35 असे 185, पढेगाव आरोग्य केंद्रातील 131 व खाजगी 21 असे 152,
टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 व खाजगी 21 असे 129, उंदिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 118 व खाजगी 6 असे 124,
निमगाव खैरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील 154 व खाजगी 22 असे 176, माळवाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 121 व खाजगी 13 असे 134 श्रीरामपूर ग्रामीण 38 ग्रामीण आरोग्य रुग्णालय 45 व खाजगी 413 असे 458 तर करोना केअर केंद्रातील 4 अशा 1414 व्यक्तींना करोना लस देण्यात येणार आहे.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये