व्यावसायीकाची गळफास घेऊन आत्महत्या; या ठिकाणी घडली घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- सुवर्ण व्यावसायीक ऋषिकेश शिवाजी मैड (वय 28) या सुवर्ण व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे.

हि घटना संगमनेर शहरात घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान हि घटना काल दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, ऋषिकेश मैड यांनी घुलेवाडी परिसरातील आपल्या निवासस्थानी दुपारी गळफास घेतला.त्यांना शहरातील एका रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद केली. अधिक तपास निलेश धादवड करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News