कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी; शेतकऱ्यांची केंद्राकडे मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- सरकारने आयात कांद्यासाठी दिलेल्या सवलतींच्या नियमांना 31 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारने 14 सप्टेंबर 2020 रोजी कांदा निर्यातबंदी जाहीर केली होती.

कांद्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आयातीला प्रोत्साहन देतानाच आयात कांद्यावर धुरीजन्य रसायनांची प्रक्रिया आणि प्रमाणपत्र सादरीकरणाला 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

कांद्याच्या भावामध्ये सध्या चढउतारास पाहायला मिळत आहे. त्यातच केंद्र सरकारने आयात कांद्यासाठी दिलेल्या सवलतींच्या नियमांना 31 जानेवारी 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

केंद्र सरकारने 14 सप्टेंबर 2020 रोजी कांदा निर्यातबंदी जाहीर केली होती. पण आता ही बंदी उठविण्याची गरज असताना, परदेशातून कांदा आयात करण्याच्या सवलतींना मुदतवाढ दिली आहे.

तसेच कांदा व्यापार्‍यांवर साठा मर्यादेची अट घालून कांद्याचे भाव पाडले. आता कांद्याचे भाव कमी झाल्याने आणि नवीन कांद्याचे पीक बाजारात येत असल्याने निर्यातबंदी त्वरीत उठवावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून होत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment