मागासवर्गीय कुटुंबीयांवर हल्लाकरणाऱ्यास तडीपार करा …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- मागासवर्गीय कुटुंबीयाच्या घरावर जातीयद्वेषातून हल्ला करणाऱ्या दीपक सावंत व त्याच्या इतर साथीदारांना तडीपार करून त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल

व्हावा व अ‍ॅट्रोसिटीअ‍ॅक्टप्रमाणे ठोकळ कुटुंबियांना भरपाई देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, विधानसभा अध्यक्ष प्रतिक जाधव, शहराध्यक्ष संतोष जाधव, अतुल काते उपस्थित होते. निर्मलनगर शिरसाठ मळा येथील मंदा ठोकळ यांच्या नातवाचा वाढदिवस होता.

त्यादिवशी दीपक सावंत व त्याचे साथीदार अक्षय थोरवे, तुषार थोरवे, गजानन सावंत यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. कार्यक्रम सुरु असल्याचा राग धरुन सावंत व त्याच्या इतर साथीदारांनी ठोकळ कुटुंबीयांवर हल्ला केला.

यात अरुण ठोकळ हे जखमी झाले. महिलांना देखील मारहाण झाली आहे. या गुंडांना तडीपार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment