अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर रविवारी एक नंबर गावराण कांद्याला १६०० ते २००० रूपये तर लाल कांद्याला १७५० ते २२०० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला.
मंगळवारी बाजार समिती मोंढ्यावर एक नंबर गावरान कांद्याला २४०० ते ३१०० रुपये तर लाल कांद्याला २३०० ते ३००० रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला होता.
सहा दिवसाच्या कालावधीत कांद्याच्या बाजारभावात तब्बल १००० रुपयांची घट झाली आहे. रविवार २० डिसेंबरला राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर गावरान कांद्याची ८३१९ गोणी तर लाल कांद्याची ११२४ गोणी आवक झाली होती.
दोन नंबर गावराण कांद्याला ८५० ते १५९५ रुपये, दोन नंबर लाल कांद्याला १००० ते १७४५ रुपये, तीन नंबर गावरान कांद्याला २०० ते ८४५ रुपये,
तीन नंबर लाल कांद्याला २०० ते ९९५ रुपये तर गावरान गोल्टी कांदा ९०० ते १६०० व लाल गोलटी कांदा ९०० ते १७०० रूपये क्विंटल बाजारभावाने विकला गेला.
बाजार समितीच्या मोंढ्यावर ११ गोणी गावरान कांद्याला २४०० रुपये, २४ गोणी गावरान कांद्याला २२०० ते २३०० रुपये, तर ४६ गोणी लाल कांद्याला २५०० रुपये, १० गोणी लाल कांद्याला २४००, तर १२ गोणी लाल कांद्याला २३५० रुपये हा अपवादात्मक बाजारभाव मिळाला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये