दबा धरून बसलेल्या बिबट्याने तरुणावर केला हल्ला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.

यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील सराला – माळेवाडी रस्त्यावर बिबट्याने तरुणांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, विजय नारायण विटेकर (वय २७) माळेवाडी- सराला रस्त्यावर आपल्या दुचाकी वरून घराकडे परतत असतांना बिबट्याने अचानक झेप घेतली.

सुदैवाने या हल्य्यात तो तरुण बचावला असून त्या तरुणाच्या हाताला व पाठीला बिबट्याचे दात लागल्याने त्याला तात्काळ श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती माळेवाडीचे सरपंच सोपान औताडे यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News