जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; तिघांवर गुन्हा दाखल

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- जामखेड शहरातील बाजारतळ येथे दोन ठिकाणी अवैध्य रित्या कल्याण मटका नावाचा जुगार चालू आहे, अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली.

दरम्यान पोलीस नाईक रमेश फुलमाळी यांनी पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा घातला. पोलीस पथकाने कल्याण मटका चालवणारे सचिन मुरलीधर पवार (रा.तपनेश्वर जामखेड रोड),

राजेंद्र नामदेव शिंदे (रा. सदाफुले वस्ती) तसेच यांना ताब्यात घेऊन धंदा चालवणारे गणेश खेडकर (रा. कोर्ट गल्ली जामखेड), दिपक खेडकर (रा. जामखेड) या सर्वांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तसेच संबंधित ठिकाणाहून ४३०० किंमती चे मुद्देमाल व जुगाराचे साहित्य जमा करण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ना. रमेश फुलमाळी हे करीत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News