व्यापार्‍यास लुटणारी टोळी गुन्हे शाखेकडून गजाआड

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- दुकानातील रोख रक्कम बॅगेतून घेऊन चाललेल्या व्यापार्‍याचा धारदार शस्त्राचा धाक दाखवून त्याचे जवळील जवळपास पाच लाखांचा मुद्देमाल लुटणार्‍या टोळीस पोलिसांनी गजाआड केले आहे.

तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोरी गेलेल्या रोख रकमेतील 86 हजार पाचशे रुपये हस्तगत केले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी कि,

दिलीप शंकर गौड (वय 35 धंदा व्यापार रा. निवारा कोपरगाव जि अहमदनगर) यांचे किशोर वाईन्स दुकानातील रोख रक्कम बॅगे मधून घेऊन अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोरून घरी जात असताना

पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात चार इसमांनी फिर्यादीच्या गाडीला लाथ मारून त्याला खाली पाडून धारदार शस्त्राचा धाक दाखवून चार लाख 98 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरून नेला.

या घटनेबाबत कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अनिल खटके यांना हा गुन्हा सोमनाथ गोपाळ (रा.वाघ वस्ती , शिर्डी) याने व त्याचे साथीदारांनी केले असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली.

पोलीस पथकाने तातडीने आरोपी सोमनाथ गोपाळ यास ताब्यात घेतले. त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हा त्याचे साक्षीदार गणेश चव्हाण, राहुल गोडगे ,रविंद्र तुपे, सिध्दार्थ तुपे, अनिल कांबळे व सागर तांदळे यांनी मिळून केला असल्याची कबुली दिली.

या माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन त्यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत केले आहे. सिद्धार्थ तुपे, अनिल कांबळे व सागर तांदळे यांचा शोध घेतला परंतु ते मिळून आले नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!