संगमनेर :- भाजप-सेनेच्या भूलथापांना लोक कंटाळले असल्याने आभासी महायुती सरकारचा पराभव अटळ आहे. भावी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
राज्यात भाजप-सेनेच्या विरोधात वातावरण आहे. विधानसभा निवडणूक स्थानिक प्रश्नांवर होते. कर्जमाफी, वाढलेली महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला ठेवत ते काश्मीरसारख्या विषयावर भावनिक राजकारण करत होते.

जनादेश यात्रा काढून ते जनतेला आदेश देत होते. शिवसेनादेखील या सरकारबरोबर फरफटत गेली. सत्तेत राहून त्यांनीच त्यांच्या सरकारविरोधात केलेले शेतकऱ्यांसाठीचे कर्जमाफी आंदोलन जनतेने बघितले आहे, असे ते म्हणाले.
- कसोटीत दुहेरी शतक करणारा शुभमन गिल ठरला सहावा भारतीय कर्णधार! पाहा टॉप-5 कर्णधारांची नावे आणि कामगिरी
- NEET न देता डॉक्टरसारखी कमाई! दहावीनंतर ‘हे’ कोर्स मिळवून देतील करोडोंची नोकरी, जाणून घ्या टॉप मेडीकल कोर्स
- शेअर, सोनं, की मल्टी-अॅसेट फंड? कमी जोखमीसह जास्त कमाई देणारा पर्याय कोणता?; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
- हजारो टन वजनाची ट्रेन रुळावर नेमकी कशी बसवतात?, भारतीय रेल्वेचं भन्नाट तंत्रज्ञान तुम्हाला थक्क करून सोडेल!
- क्रिकेट इतिहासातील अजब विक्रम! कसोटीच्या पहिल्या बॉलवर सिक्स मारणारा जगातील एकमेव फलंदाज, कोण आहे हा खेळाडू?