या तालुक्यातील कोरोनाबाधितांची तीनहजाराकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे.

नुकतेच नेवासा तालुक्यात कोरोना संक्रमितांची संख्या वेगाने घसरली असतानाच काल पुन्हा एकदा एका दिवसात दोन अंकी संख्या गाठली आहे.

काल 7 गावांतून 12 संक्रमित आढळले असून तालुक्यातील एकूण संक्रमितांची संख्या तीनहजारांच्या जवळपास पोहचली आहे. दरम्यान तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 894 झाली आहे.

काल तालुक्यात सर्वाधिक चौघे संक्रमित गोपाळपूर येथे आढळून आले. नेवासा शहरात दोघे संक्रमित आढळले तर भेंडा बुद्रुक, पाचेगाव, सोनई व सुरेगाव येथील प्रत्येकी एक संक्रमित आढळून आला आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment