संथ झालेला वेग पुन्हा वाढला; पुन्हा होतेय बाधितांची भर

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे.

सुरुवातीच्या काळात सुसाट असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपूवी कमी झाला होता. यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र सावधान संगमनेर तालुक्यात कोरोना पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

संगमनेर तालुक्यात काल दिवसभरात 38 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण रुग्णसंख्या 5 हजार 815 इतकी झाली आहे.

जिल्ह्यातील रिकव्हरी रेट समाधानकारक असला, तरी वाढत्या रुग्णसंख्येने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. दरम्यान, प्रशासनाची धावपळ वाढली असून लस उपलब्ध होईपर्यंत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News