महत्वाची बातमी : सलग तीन दिवस बँका बंद राहणार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- नवीन वर्ष साजरं करण्यासाठी आपण जर कुठं बाहेर गावी जाण्याचे ठरत असेल, अथवा रोखीचे व्यवहार करण्याचे नियोजन असणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण, या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.

त्यामुळे बँकेशी संबंधित सर्व कामं गुरुवारपर्यंतच उरकून घेणे आवश्यक आहे. या आठवड्यात नाताळ असल्याने शुक्रवार २५ डिसेंबर बँकांना सुट्टी असेल,

त्याच्या दुसऱ्या दिवशी २६ डिसेंबर रोजी महिन्याचा चौथा शनिवार असल्याने देखील बँका बंद असतील. कारण, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते.

व यानंतर रविवार असल्याने बँकांना सुट्टी असणार आहे. अशाप्रकारे या आठवड्यात सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. याशिवाय, नव वर्ष सुरू होताच १ जानेवारीपासून बँकांच्या नियमांमध्येही काही बदल होत असल्याने,

बँकेशी संबंधित व्यवहार वेळेतच पूर्ण करून घेणे योग्य ठरणार आहे. तसेच, ३१ डिसेंबर ही आयकर भरण्याची अंतिम तारीख असल्याने, यासाठी बँकेशी संबंधित काही कागदपत्र लागल्यास, बँकांच्या सुट्टीमुळे कामाचा खोळंबा देखील होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe