भाजपची पहिली यादी जाहीर : नगर जिल्ह्यातून या आठ नेत्यांची उमेदवारी फायनल !

Published on -

अहमदनगर :- भाजपाने विधानसभा निवडणूकीसाठी दिल्लीतून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. 125 उमेदवारांच्या ह्या यादीत नगर जिल्ह्यातील आठ जागांचा समावेश आहे.

अहमनगर जिल्ह्यातून भारतीय जनता पक्षाच्या वतीने वैभव पिचड, राधाकृष्ण विखे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते, प्रा.राम शिंदे शिवाजीराव कर्डीले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


भाजपची पहिली यादी जाहीर : नगर जिल्ह्यातून विखे, शिंदे, पाचपुते, पिचड, कोल्हे,मुरकुटे,राजळे, व कर्डीले यांची उमेदवारी फायनल !

भाजपने कर्जत-जामखेडमधून पालकमंत्री राम शिंदे, शेवगाव-पाथर्डीतून मोनिका राजळे, कोपरगावमधून स्रेहलता कोल्हे, राहुरीतून शिवाजीराव कर्डिले, नेवाशातून बाळासाहेब मुरकुटे यांना भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे. 

मंत्री राधाकृष्ण विखे यांना शिर्डीतून तर राष्टवादीतून आलेले आमदार वैभव पिचड यांना अकोलेतून उमेदवारी दिली आहे. याशिवाय श्रीगोंद्यातून माजीमंत्री पाचपुते यांना पुन्हा संधी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News