दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- सध्या जिल्ह्यात चोऱ्या दरोडे खून आधी घटना मोठ्या प्रमाणात वाढले असून, दररोज कोणत्या ना कोणत्या भागात चोरीच्या घटना घडताहेत.

यामुळे पोलिसांचा धाक नसल्याचे स्पष्ट होत आहे. नुकतेच श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिसांनी विसापूर नगर दौंड रस्त्यावर बस स्टॉप जवळ कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद केली.

त्यांच्याकडून पोलिसांनी कोयता, दोरी व मिरची पावडर आदी साहित्य जप्त केले आहे. याबाबत सविस्तर असे की दरोडेखोरांची टोळी कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या बस स्टॉप वर छापा टाकला असता तेथे काहीजण अंधारात दबा धरून बसलेले पोलिसांना आढळून आले.

पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता गोप्या काशिंग्या भोसले (वय ३६ वर्षे), प्रवीण काळशिंग्या भोसले या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर गणेश शिवाजी काळे (रा. तांदळी ता. श्रीगोंदा), किरण उर्फ कृष्णा कुज्या चव्हाण (रा. खरातवाडी ता. श्रीगोंदा) यांच्यासह इतर साथीदार अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

ताब्यात घेतलेल्या दोघांकडून पोलिसांनी कोयता, दोरी व मिरची पावडर आदी साहित्य ताब्यात घेतले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment