अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-अकोले तालुक्यातील मेहेंदुरी ते फरगडे वस्ती दरम्यान निळवंडे डाव्या कालव्याचे काम जलद गतीने चालू आहे.
या कामाचा ठेकेदार बेजबाबदारपणे काम करत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम बंद पाडले.
यावेळी माजी आमदार वैभव पिचड यांनी अधिकार्यांची चांगलीच कानउघाडणी करून शेतकर्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत खडसावले.
मेहेंदुरी ते फरगडे वस्ती दरम्यान निळवंडे डाव्या कालव्याचे काम चालू आहे. ठेकेदाराच्या बेजबाबदारपणे कामामुळे अनेक ठिकाणी शिवार रस्ते फोडल्यामुळे ऊस तोडणी बंद झाली आहे.
तोडलेला ऊस शेतातच पडून आहे. तसेच पाईपलाईनची मोडतोड झाल्यामुळे शेताला पाणी देणे मुश्कील झाले आहे. शिवार रस्ते फुटल्यामुळे जनावरांचा चारापाणी, ऊस वाहतूक,
दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्यांनी अधिकार्यांकडे तक्रार केली. परंतु अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराचा बेजबाबदारपणा वाढतच गेला.
अखेर सोमवारी संतप्त शेतकर्यांनी एकत्र येऊन माजी आमदार पिचड यांच्या नेतृत्वाखाली निळवंडे डाव्या कालव्याचे काम बंद पाडले.
यावेळी पिचड यांनी त्यांना शेतकर्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडविल्यानंतर कालव्याचे काम चालू करा; नाहीतर उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved