कायदा सुव्यस्थेचा फज्जा; निलम गोऱ्हे यांचं पोलीस महानिरीक्षकांना पत्र

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात भोंदु बाबांची प्रकरणे वाढत चालली आहेत. ही प्रकरणे आटोक्यात आणण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याची मागणी विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी केली आहे.

जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दरोड्यांचं प्रमाण वाढलं आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी गोऱ्हे यांनी नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षकांना पत्र लिहिलं आहे.

यात त्यांनी नगर नाशिक परिसरात नुकत्याच अटक झालेल्या बुवाप्रमाणे अनेक नावांनी वावरणाऱ्या अन्य एका बुवाबाजी करणाऱ्या गुन्हेगारावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

जमिनीतून सोने काढून देतो, भरपूर धनलाभ करुन देण्याचे आमिष भक्तांना दाखवणार्‍या भोंदूबुवाला अखेर पोलिसांनी अटक केली.अशी अनेक नावे प्रचलित वापरुन फसवणूक करणार्या गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी.

कारवाईबाबत निलम गोऱ्हेंच्या पोलिसांना सूचना

  • 1. या दरोडेखोरांचा सतत वावर हा नाशिक, औरंगाबाद, नगर आणि बीड या जिल्ह्यात सुरू असतो. दरोड्यांच्या घटना भविष्यात घडू नये, दरोडेखोरांचा नायनाट करण्यासाठी नगर दरोडेखोर विरोधी जिल्ह्यात विशेष पोलीस पथकाची स्थापन करावी.
  • 2. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी पूर्वीच्या दरोड्यांच्या घटनांमध्ये आणि या घटनेत काय साम्य आहे याचा अभ्यास करावा. जेणेकरून दरोड्यांच्या कार्यपध्दतीवरून आरोपींना अटक करण्यास मदत होईल.
  • 4. दरोडेखोरांकडून गावाशेजारील वस्त्यांना लक्ष केलं जात आहे. अशा वस्त्यांना गावाशी अथवा पोलीस स्थानकाशी जोडण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात याव्यात.
  • 5. समाजकंटक, दरोडेखोर यांना संरक्षण देणाऱ्या काही प्रवृत्ती या जिल्ह्यात आहेत. दरोडेखोरांच्या मुळाशी जाऊन अशा समाजकंटकांवर देखील कारवाई होणे आवश्यक आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe