अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने सख्या भावावर धारदार चाकूने पोटावर सपासप वार करुन जीवे ठार मारुन खुन केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मयत नईम अब्दुल लतिफ देशमुख, वय ५० रा. भानसहिवरा, ता. नेवासा यांचामुलगा साहील नईम देशमुख, वय २४ हल्ली रा. मुकुंदनगर, अ. नगर, मूळ रा. भानसहिवरा,
ता. नेवासा याच्या फिर्यादीवरून आरोपी रफिक अब्दुल लतिफ देशमुख, वय ४४, मोईन अब्दुल लतिफ देशमुख, वय ४०, मदिन अब्दुल लतिफ देशमुख सर्व रा.अ. नगर यांच्याविरुद्ध नेवासा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणाचा पुढील तपास सपोनि ठाकूर करीत आहे. साहील नईम देशमुख या तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे की, आरोहपणे वडील नईम अब्दुल लतिफ देशमुख यांच्या पोटावर धारदार सुरीने वार करुन जिवे ठार मारून खून केला
तसेच मला व साथीदार यांच्या अंगावर मिरचीची पूड व ड्रममधील काहीतरी पदार्थ टाकून लाकडी दांड्याने मारून शिवोगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved