डिझेलची चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांना पोलिसांकडून अटक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :-कर्जत तालुक्यातील नगर-सोलापूर रस्त्यावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास गस्त घालत असताना हायवा गाडीतून डिझेल काढून चोरी करताना दोन जणांना पकडले. नगर-सोलापूर रस्ता हा चोरट्यांचा अड्डा झाला होता.

नुकतेच कर्जत येथे उपनिरीक्षक म्हणून हजर झाले पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त व्हावा म्हणून गस्ती पथक तयार केले.

याच गस्ती पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमरजित मोरे कॉन्स्टेबल रवींद्र भाग गणेश काळाणे व चालक नितीन आरोटे हे नगर-सोलापूर रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना ज्योतिबावाडी येथे संशयास्पद स्थितीत वाहन उभे असताना आढळले,

यावेळी त्यांनी त्याची चौकशी केली असता या ठिकाणी रवींद्र ननवरे व रामदास शेळके हे हायवा गाडी क्रमांक केए ४८-६६४१ या गाडीतील ड्रिल मशीनमधील नवीन डिझेल काढून ते पिकअप जीपमधील प्लास्टिक बॅरलमध्ये भरताना आढळून आले. पोलिसांनी हायवा गाडी चालक मनबोध गोस्वामी व इतर दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe